आता खासगी रुग्णालयातही मिळणार करोनाची लस! किंमत ठरली, लवकरच घोषणा होण्याची शक्यता!
आता खासगी रुग्णालयातही मिळणार करोनाची लस! किंमत ठरली, लवकरच घोषणा होण्याची शक्यता!
खासगी रुग्णालय किंवा क्लिनिक्समध्ये देखील करोना लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यासाठीची कमाल किंमत ठरवून दिली जाणार आहे.
क्लिक करा आणि वाचा: इंधन दर वाढीचा भाज्यांच्या किंमतीवर परिणाम
भारतात सीरम इन्स्टिट्युटची Covishield आणि भारत बायोटेकची Covaxin या दोन करोना लशींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरात सरकारतर्फे मोफत या लशींचं लसीकरण केलं जात आहे. सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही लस देशातील वेगवेगळ्या वर्गांना दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयांमध्ये देखील करोनाची लस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे. लवकरच यासंदर्भातली घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, खासगी रुग्णालयात गेल्यास पैसे देऊन ही लस घ्यावी लागणार आहे. त्यासाठीचे दर देखील सरकारने निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे.
खरेदी करावी लागणार करोनाची लस!
केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोग्य सेवा पुरवणाऱ्या खासगी ठिकाणी (रुग्णालय, क्लिनिक, दवाखाने) करोनाची लस लवकरच मिळू शकणार आहे. मात्र, खासगी ठिकाणी ही लस खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठीची कमाल किंमत देखील सरकारकडून निश्चित करण्यात येईल. सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी लस मात्र पूर्णपणे मोफत असेल. तिचा खर्च हा पूर्णपणे सरकारकडून उचलला जाईल.”
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा