थकबाकीदारांना महावितरणचा 'शॉक', ५६९ ग्राहकांची तोडली वीज जोडणी
थकबाकीदारांना महावितरणचा 'शॉक', ५६९ ग्राहकांची तोडली वीज जोडणी
रत्नागिरी : महावितरणने रत्नागिरी मंडळातील थकीत ५६९ ग्राहकांची वीज जोडणी तोडली आहे. मागील १५ दिवसांत एक लाख ६३ हजार ९३४ ग्राहकांनी १९ कोटी ३२ लाखांचा भरणा महावितरणकडे केला आहे. जानेवारी अखेर महावितरणची एकूण ८३ कोटींची थकबाकी आहे. त्यामध्ये दि. ३१ मार्चपासून ४५ हजार ४०७ ग्राहकांनी एकदाही वीजबिल न भरलेल्या ५१ कोटी १५ लाख १८ हजार रुपयांचा समावेश आहे. थकीत वीजबिलांमुळे महावितरण आर्थिक कोंडीत सापडले आहे. थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थकीत ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरीतील ५६९ ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात आली. याचा धसका घेऊन काही ग्राहकांनी थकित वीजबिलाचा भरणा केला. मात्र, तरीही ३१ मार्चपासून वीजबिल न भरलेल्या ३८ हजार १०४ ग्राहकांकडे ३४ कोटी ४५ लाखांची थकबाकी आहे
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक

Comments
Post a Comment