बर्ड फ्लू :राज्यातील सर्वात मोठं कलिंग, तब्बल ९ लाख कोंबड्या मारल्या जाणार!!



राज्यातील सर्वात मोठं कलिंग, तब्बल ९ लाख कोंबड्या मारल्या जाणार


नंदुरबार :राज्यातलं सर्वात मोठं कलिंग नवापूरमध्ये होणार आहे. नवापूरमध्ये तब्बल ९ लाख कोंबड्या मारल्या जाणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लूचे अहवाल सकारात्मक आल्या नंतर या ठिकाणी कोंबड्या मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातील या ठिकाणी १ लाख पेक्षा अधिक पक्षी मारले जाणार आहेत. यासाठी पशु संवर्धन विभागाने १०० पथक तैनात केली आहेत. 

          

एक पथकात चार पशु वैद्यकीय कर्मचारी आणि दोन महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. धुळे, जळगाव अश्या अन्य जिल्ह्यातील पशु संवर्धन विभागाचे अधिकारी नागपुरात दाखल होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक औषधांचा साठाही नवापुरात करण्यात आला आहे. 

                                                                               तालुक्यातील २६ पोल्ट्रीपैकी आज ४ ठिकाणी कलिंग केली जाणार आहे. कोंबड्या आणि अंडे नष्ट करण्याचे काम एकाच वेळी केले जाणार आहे. पशुसर्वधन आयुक्त स्वतः आज नवापूर दौरा करणार असल्याची माहिती आहे. जे सी बी द्वारे बाधित पोल्ट्रीमध्ये मोठाले खडे केले जात आहेत. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पक्षांच्या वाहतुकीचे आणि खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.


...............................

२ लाख हून अधिक वाचक

५००+ व्हॉट्सॲप ग्रुप

ऑनलाईन व प्रिंट मीडिया

.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256



Comments