कोरोना अजून गेलेला नाही, सावधानता बाळगा- राज्यपाल

 कोरोना अजून गेलेला नाही, सावधानता बाळगा

  • मुंबई :कोरोना संसर्ग देशात येऊन एक वर्ष होत आले. मात्र कोरोनाची इतिश्री अद्याप झालेली नाही. यास्तव सर्व नागरिकांनी यापुढेही सातत्याने कोरोनाबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
  • अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने राजभवन येथे विविध क्षेत्रातील ३५ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
  • महाराष्ट्र, केरळ यांसह काही राज्यात कोरोनाचे रुग्ण पुनश्च वाढत आहेत. कोरोनासंदर्भात बेफिकीरीने न राहता सावधगिरी बाळगून परंतू निर्भयतेने काम करण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
  • राज्यपालांच्या हस्ते सायन इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. मोहन अच्युत जोशी, केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शुश्रुषा हॉस्पिटलचे डॉ. हर्षद शाह, डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. विभा अग्रवाल, समाज सेवक इक्बाल इस्माईल ममदानी, रुग्णवाहिका चालक अनिल आदिवासी, उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, वडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे यांसह इतर कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
  • कोविडचे नियम पाळा, नाहीतर लॉकडाऊन! मोकळेपणाने रहायचेय की बंधनात हे जनतेनेच ठरवावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे





२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक

 RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Comments