घटस्फोटाच्या सोहळ्याचा फोटो व्हायरल होतोय...

 



कोण करतं असं! व्हायरल होतोय घटस्फोटाच्या सोहळ्याचा फोटो, जाणून घ्या पूर्ण प्रकरण


मुंबई- सध्या सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या फोटोने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडलं आहे. एवढंच बाकी राहील होतं.. आता हे ही पाहायला मिळालं... पुणे तिथे काय उणे... पाटलाचा नादच खुळा... लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही अशा एक ना अनेक कमेंट या फोटोवर येत आहेत. घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्की हा प्रकार काय आहे या विचाराने सारेच चिंतेत पडले...

का लावलं घटस्फोट सोहळ्याचं पोस्टर

चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून 'मंगलाष्टक रिटर्न' या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटा अंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे. नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे, हा आगळावेगळा सोहळा कशाचे भाकीत उलगडणार आहे याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असून या घटस्फोट सोहळ्याने तर सोशल मीडियावर वेगळाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/joinchat/LtZfLBeZGB6EHEr6Ks44rw
...............................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256




Comments