कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक यादी सदोष व चुकीची असल्याबाबत राष्ट्रवादी कोल्हापूर शहर पदाधिकारी यांच्या वतीने मा. आयुक्तसो यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रारूप यादी दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केली होती. सदर जाहीर केलेली यादी ही संपूर्ण 81 प्रभागात चुकीची असून सदोष आहे. एका प्रभागातील 200 ते 300 नावे दुसर्या प्रभागात गेल्याचे आढळून आले आहे. मतदार मतदान करताना उदासीन असतात. त्यास पत्ता किंवा नाव बदलून घेण्याचीही इच्छा नसते, त्यामुळे मतदार मतदानापासून वंचित राहतो. हे सर्व टाळण्यासाठी या अगोदर प्रसिद्ध केलेली प्रारूप यादी रद्द करावी व नवीन यादी प्रसिद्ध करावी. शहरातील प्रभागात महापालिकेचे माहितगार कर्मचारी घेऊन नवीन सर्व्हे करावा व त्याच्या आधारे नवीन यादी प्रसिद्ध करावी. असे निवेदन राष्ट्रवादी शहर दाधिकार्यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यांनी माननीय आयुक्तसो यांना सदर यादी मधील चुकीची दुरुस्ती करून अद्ययावत यादी प्रकाशित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार, सरचिटणीस सुनील देसाई, संजय कुराडे तसेच माजी नगरसेवक आदिल फरास, राजेश लाटकर, उत्तम कोराने,अजित राऊत, विनायक फाळके, निरंजन कदम, सचिन पाटील, बागवान आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121
Comments
Post a Comment