अशी माय गुणी -दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास




 अशी माय गुणी 

मायेच्या पायात काटे रुतायचे
तेव्हा मला जीवन कळायचे,
शेतात ती राबायची अनवाणी
तेव्हा डोळ्यातून अश्रू गळायचे.(१)


माय लाकडाची चूल भुकायची
तेव्हा पोटातील कावळे पळायचे,
नाना दारिद्रय वाटेला मायच्या
तेव्हा दुःखाचे खूप क्षण छळायचे.(२)


उपासमार आमच्या वर यायची
तेव्हा मायचे मन फार जळायचे,
मायच्या मुखावरील स्मीत हसूने
तेव्हा आमचे सर्वच संकट टळायचे.(३)


उपाशीच ज्वारीचे पीठ दळताना
तेव्हा तीच्या ममतेने मन मळायचे,
खरंच जीवन जगणे काय आहे
तेव्हा वास्तव सत्य आम्हाला वळायचे.(४)

पोटभर खाऊ आम्हास भरवून
तेव्हा हळवे मन तीचे ढळायचे,
रिकामे पोटी झोपताना बघून
तेव्हा आमचे ह्रदय हळहळायचे.(५)

अशी माय फार गुणी होती

तीला सुख देण्या काळीज कळकळायचे,
तीचे ते राहिले स्वप्न अधूरे
पुर्ण करण्यासाठी मन हळहळायचे.(६)


 श्री. देविदास हरीदास वंजारे 
ता.किनवट जि.नांदेड
फ्रेश न्यूज साहित्य सहवास 
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-


...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments