बौद्ध समाजाच्या वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती उत्साहाने साजरी

मिरज:- (प्रतिनिधी) नदीवेस बौद्ध वसाहत, मिरज येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक बुद्ध विहारामध्ये बहूजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली. बौद्ध तरूण मंडळ मिरज चे प्रभारी कार्याध्यक्ष मा. प्रमोद लक्ष्मण कांबळे व बौद्ध समाजाचे उपासक मा. रूपेश आलासे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. यानंतर त्रीसण पंचशिल ग्रहण करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष करणेत आला.

     यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ वी जयंती निमीत्त बोलताना रिपाइं(आठवले) आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा बौद्ध तरूण मंडळ मिरज चे प्रभारी अध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे म्हणाले, "ना जातिभेद, ना धर्मभेद, प्रजानिष्ठा ठाई ठाई,अशी माझ्या शिवबाची शिवशाही"  म्हणजेच राजेंच्या स्वराज्यात जातीभेदाला, धर्मभेदाला महाराजांनी कद्यपी सहन केले नाही अथवा मान्यता दिली नाही, महाराजांच्या स्वराज्यात सर्वच जातीधर्माची प्रजा एकजूटीने, सहकार्याने, आनंदाने रहायचे, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्यातील जनतेचा सन्मान, आदर करायचे, असे बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमीत्त आदरपुर्वक अभिवादन व सर्व भारतीय जनतेस हार्दिक शुभेच्छा. 

    यावेळी बौद्ध समाजातील लहान थोर समाज बांधवांसोबत मा. प्रणवजीत कांबळे, सतिशकुमार कांबळे, प्रसेनजित कांबळे, अभिषेक आलासे, मा. गौतम कांबळे, मा. सनी कांबळे आदी उपस्थित होते. 


 

...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments