मी देव पाहिला-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास

 


मी देव पाहिला


मंदिर मस्जिद वा असो चर्च गुरुद्वारा,

तिथे धर्माचाच कहर गाजत होता..

जात नव्हे रंगही वाटून घेतले त्यांनी,

फक्त स्वार्थचा कहर शीजत होता..


आधी माझीही भोळी श्रद्धा होती,

रोजनिशी पूजापाठ भक्तीने करायचो..

भुकेने त्रासलेल्या दीनाला डावलून,

पुजाऱ्यांचे पोट दानदक्षिणेने भरायचो..


मिटलेले नयन......तेव्हाच उघडले,

जेव्हा कोरोना जगभर पसरला..

गरज असता देवघराला टाळे लागली,

मग कुठे भक्तीचा नाद ओसरला..


सलाम डॉक्टर पोलीस नर्स शिपाईस,

मानवतेसाठी प्राण पणाला लावले.. 

जात, धर्म, रंगाचा विचार न करता,

हुतात्म्याने नैतिक मूल्ये जोपासले..


राम पैगंबर येशुचे अंश भूवरी पाहिले,

अन कल्पनापल्याड नवा सूर्य उगवला..

मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वाराबाहेर,

मी माणसात माणुसकीचा देव पाहिला..


कवि : श्री. जगदीश बा. चव्हाण(©®)
    उर्फ  ✍️Silent Night✍️
पत्ता : ता. लोणार, जि. बुलढाणा
फ्रेश न्यूज साहित्य सहवास 


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...............................

फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments