रत्नागिरीत कालिदास व्याख्यानमालेस सुरुवात





रत्नागिरीत कालिदास व्याख्यानमालेस सुरुवात


रत्नागिरी : रत्नागिरीत कालिदास व्याख्यानमालेस सुरुवात झाली.श्री राम मानवी असल्याने त्याचा आदर्श घेतला पाहिजे. रामाचे श्रेष्ठत्व काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. राघवाची कथा कर्णमधुर आहे. राम हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे पुरुषाच्या उत्तमपणाची मर्यादा त्यापलीकडे कोणी नाही. गुणांचा परमोच्च बिंदू आहे. संशोधकाची वृत्ती मोकळी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मूळ वाचून व दुसर्‍यावर अवलंबून न राहता स्वतः शहानिशा केली पाहिजे. रामायणावर संशोधनात्मक अभ्यास केला पाहिजे, असे आवाहन संस्कृत भारतीचे कोकण प्रांताध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित 64 व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात अज्ञात रामायण या विषयावर ते बोलत होते. राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला. 


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...............................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Comments