पेट्रोल महाग झाल्याने मोटर सायकलने केली आत्महत्या
पेट्रोल महाग झाल्यामुळे चक्क आपल्या मोटार सायकलीला एका युवकानेआत्महत्या करायला लावले. पेट्रोल ने शंभरी गाठली आहे त्यामुळे हैराण झालेल्या एका युवकाने आपल्या घरासमोरील झाडाला मोटर सायकल बंधून बांधून मोटर सायकलची आत्महत्या घडवून आणली. सध्या सोशल मीडियावर या आत्महत्याग्रस्त गाडीचा फोटो धुमाकूळ घालत असून बऱ्याच युवकांनी ही परिस्थिती आता सर्वत्रच झाली आहे. तसेच तकाही युवकांनी यावेळी एक गंभीर बाबही बोलून दाखवली "या गाडी सोबत कोणत्या युवकाने आत्महत्या केली नाही म्हणजे मिळवली." सध्या पेट्रोल, डिझेल, गॅस दारवाढ दिवसेंदिवस वाढतच आहे. याच्या विरोधात विविध संघटना, पक्ष आंदोलनाच्या रूपाने जनतेचा आक्रोश शासनासमोर मांडत आहेत. पण अद्याप यावर कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही.
यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर अगोदरच बेरोजगार झालेल्या जनतेसमोर कोणता मार्ग उरणार असा प्रश्न युवा वर्गातून विचारला जात आहे. पण सध्या परिसरामध्ये आणि सोशल मीडिया वरती त्याच्या या मोटर सायकलची अनोख्या आत्महत्येची चर्चा होत आहे.

Comments
Post a Comment