जीएसटी विरोधात ‘भारत व्यापार बंद’ बाबत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटना तर्फे कडकडीत बंद पाळून, मा. जिल्हाधिकारी व मा. आयुक्त, केंद्रीय जीएसटी विभाग यांना निवेदन सादर....



कोल्हापूर २७ : ‘केंद्र सरकराने लागू केलेल्या जीएसटी मधील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणालीच्या विरोधात’ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली (कॅट) व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई यांनी ‘भारत व्यापार बंद’ व ‘देशव्यापी चक्काजाम’ करण्याबाबत आवाहन केलेप्रमाणे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सर्व संलग्न संघटनांनी ‘भारत व्यापार बंद’ मध्ये भाग घेऊन बंद कडकडीत पाळून मा. जिल्हाधिकारी व मा. आयुक्त, केंद्रीय जीएसटी विभाग यांना निवेदन सादर केले.
        (छाया - तय्यब अली)                                 ‘गेल्या ३ ते ४ वर्षात कर प्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. वारंवार नियम बदलण्यात येत असल्याने करप्रणाली किचकट झाली आहे. विलंब शुल्क अनावश्यक लावले जात आहे. परताव्यात चूक झाल्यास दुरुस्त करता येत नाही. जीएसटी पोर्टल व्यवस्थित चालत नाही. त्यांचा बहुमुल्य वेळ कारकुनी कामे करण्यात जात असल्याने व्यापारी नाखूष आहेत. भारतातील सर्व छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक यांना कर कायद्यांची पूर्तता करायची असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक असते. छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना ही कामे स्वत:च करावी लागतात. कर विभागाला कर चुकविणाऱ्यांना जेरबंद करता येत नाही, म्हणून दरवर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांवर लादले आहे. त्यात लहान, मध्यम, प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत.’ 

त्यानुसार देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना देण्यात येणारे निवेदन त्यांचे शासकीय प्रतिनिधी म्हणून मा. दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर व मा. विद्याधर थेटे, आयुक्त, केंद्रीय जीएसटी विभाग, कोल्हापूर यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच जीएसटी मधील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणालीबाबत केंद्रशासनाकडून योग्य तो सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. अशी अपेक्षा या निवेदनाव्दारे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटना यांनी व्यक्त केली.

यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली (कॅट) चे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील व राष्ट्रीय संघटन सचिव ललित गांधी, चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, मानद सचिव धनंजय दुग्गे व वैभव सावर्डेकर, खजानिस हरिभाई पटेल, माजी अध्यक्ष आनंद माने, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, तौफिक मुल्लाणी, संपत पाटील संभाजीराव पोवार तसेच विजय नारायणपूरे व महेश सामंत उपस्थित होते. 


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments