बहुजन परिवर्तन पार्टीच्या वतीने मायक्रोफायनान्स मुक्त महाराष्ट्रसाठी आंदोलन


 कोल्हापूर : बहुजन परिवर्तन पार्टी पश्चिम महाराष्ट्र राज्य व  महिला बचाव समितीच्या वतीने मायक्रो फायनान्स च्या विरोधात  जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले. 2012 पासून मायक्रो फायनान्स हे खाजगी सावकार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी मोर्चे आंदोलने करून मायक्रोफायनान्स मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी बहुजन परिवर्तन पार्टीच्या वतीने लढा दिला जात आहे. भारतामध्ये 482 बेकायदेशीर मायक्रो फायनान्स कंपन्याचे मोठ्या प्रमाणावर जाळे विणून खाजगी सावकारकी करत आहेत. महाराष्ट्र मध्ये साडेतीन ते चार लाख महिला मायक्रो फायनान्स च्या विळख्यात अडकल्या असून, अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक महिलांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. भारतात चार कोटींच्या वर महिला त्या मायक्रो फायनान्स च्या जाळ्यात अडकल्या आहेत. तर  महाराष्ट्रात राष्ट्रीयीकृत अनेक बँका बंद पडल्या आहेत. भारतामध्ये बेकायदेशीर मायक्रो फायनान्स कंपन्या गोरगरीब जनतेच्या घरात जाऊन पैसे वाटत आहेत. पैसे वाटप करून झाल्यानंतर वसुलीसाठी महिलांच्या घरात जाऊन, महिलांना अश्लील बोलून, जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत मायक्रो फायनान्स एजंट घरातून जात नाहीत.   

मायक्रो फायनान्स महाराष्ट्र संपूर्ण भारतात आपल्या जाळ्यात अडकण्यासाठी नवीन योजना चालू केली आहे. ती योजना म्हणजे "एखादा माणूस बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी गेले असता, त्या माणसाचे सिबील चेक केले जाते, ते सिबील शासनमान्य आहे का?, जर शासन मान्य असेल तर भारतातील एका नागरिकाने राष्ट्रीयीकृत बँकेत कोणतेही कर्ज नसेल, तर त्या माणसाचे सिबील योग्य दिसणार आहे का?, म्हणजे कर्ज घेतले तर, त्याचे योग्य असेल अन्यथा तो माणूस कर्जास लायक नाही. हे कितपत योग्य आहे. भारत हा संविधानावर चालत असतो. भारतातील व्यक्तिस्वातंत्र्याचा खून होतोय का? हा भारतास, महाराष्ट्रास पडलेला प्रश्न आहे. बहुजन परिवर्तन पार्टी पश्चिम महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीने मायक्रो फायनान्स कंपनीच्या वसुली विरोधात स्टे ऑर्डर घेतली असून, मायक्रो फायनान्स कंपन्या मुंबई हायकोर्टला देखील जुमानत नसून, बेकायदेशीर वसुली करत आहेत. तरी बँकेचे भारतातील  सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सहकार क्षेत्रातील संस्था टिकल्या पाहिजेत. गोरगरीब जनतेला उद्योग-व्यवसाय मिळालेच पाहिजेत. यासाठी सरकारने जनतेच्या वतीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. अन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा संघटनेचे अध्यक्ष - बाजीराव नाईक यांनी दिला आहे. 

यावेळी मनिषा नाईक, शोभा नलवडे, दादा जगताप, असीम नुरा, सोनाली कोळी यावेळी उपस्थित होते.

Comments