पंचगंगा नदीकाठचा बुरुज धोकादायक स्थितीत.. बुरुजाज्वल अभिनव आंदोलन
कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठचा बुरुज कोसळून अनेक महिने झाले, ताटबंधीही पडण्याच्या परिस्थितीत आहे, येथे होणाऱ्या अपघातास जबाबदार कोण या प्रश्नासाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन पंचगंगा नदी येथील बुरुजाज्वल अभिनव आंदोलन केले, 1 मार्च पर्यंत हे दुरुस्त नाही, झाले तर पात्रात उतरून आंदोलन तीव्र केले जाईल असे निमंत्रक फिरोज शेख यांनी इशारा दिला.
आर्किटेक्ट, इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराने यांनी कळवले आहे की, प्रशासनास नदीघाटाच्या कोसळलेल्या घाटाचे स्ट्रक्चरल डिझाईन स्ट्रक्चरल इंजि. प्रशांत हडकर सामाजिक जबाबदारी म्हणून विना मोबदला करुन देत आहेत. याची प्रशासनाने स्वतःहून नोंद घ्यावी.
यावेळी रेल्वे कमिटी सदस्य, शिवनाथ बियानी, रमेश मोरे, अशोक पोवार शहर कृती समिती सदस्य उपस्थित होते.


Comments
Post a Comment