अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती.....
दाभोळकर कॉर्नर चौक येथे समन्वय समितीचा महारस्ता रोको आंदोलन
कोल्हापूर:शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 71 वा दिवस आहे. तीन काळे कृषी विधेयके रद्द करावेत.या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिल्ली येथे आंदोलन चालू आहे. आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत सरकार बरोबर आंदोलनातील नेत्यांच्या 12 चर्चेच्या फेऱ्या झाल्या.पण त्यातून मार्ग निघाला नाही.सदरचे आंदोलन निरनिराळ्या प्रकारे दडपण्याचा सरकारचा प्रथमपासूनच प्रयत्न आहे.आंदोलक दिल्लीमध्ये येत असतानाच त्यांच्या रस्त्यात खंदक खणून त्यांना अडवण्यात आले होते. तसेच आंदोलन कर्त्या नेत्यांवर देशद्रोहा सारखे आरोप ठेवून पोलीस केसेस देखील सरकारने दाखल केलेल्या आहेत. कडाक्याच्या थंडीत सरकारने आंदोलकांवर थंड पाण्याचे फवारे देखील मारलेले होते. तसेच सध्या आंदोलनकर्त्यांना त्रास देण्यासाठी सरकारने आंदोलन स्थळी वीज आणि पाणी कनेक्शन तोडून टाकलेले आहे.इंटरनेट सेवा देखील बंद केलेली आहे.याबाबत सर्व देशभरातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.या दिल्लीतील आंदोलकांना पहिल्यापासूनच कोल्हापूर जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती निरनिराळ्या प्रकारे आंदोलने करून पाठिंबा देत आहे. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज रोजी चक्काजाम महारास्ता रोको आंदोलन दाभोळकर कॉर्नर चौक या ठिकाणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पुकारण्यात आलेले होते .त्यानुसार सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलक, शेतकरी कार्यकर्ते मध्यवर्ती बस स्थानका जवळील दाभोळकर कॉर्नर चौक या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांनी काळे कायदे रद्द करा. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणणाऱ्यांचा धिक्कार असो. आदी घोषणा देत आंदोलकांनी दाभोळकर कॉर्नर सिग्नल येथील रस्ता चारी बाजूनी बंद केला व त्याच ठिकाणी ठिय्या मारला.यावेळी बोलताना सतीशचंद्र कांबळे म्हणाले की इंग्रज सरकारच्या काळात झाली नसेल अशी अमानुष कृती खिळे आणि तारा शेतकऱ्यांच्या वाटेवरती मारून मोदी सरकार करत आहे.त्यांनी आंदोलकांच्या परिसरातील इंटरनेट बंद केलेले आहे.आणि त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतलेला आहे. त्याबाबत व्टीट करून बोलणाऱ्या रिहाना या पॉप सिंगर ला हा आमचा अंतर्गत मामला असल्याचे सरकार सांगत आहे.पण या देशाचे पंतप्रधान मोदी हे विसरलेत की ते सुद्धा अमेरिकेमध्ये त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी गेले होते. व त्या वेळेस बरेच बोलले होते. तसेच गांधींनी देखील मार्टिन ल्युथर किंग यांच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे असे चुकीचे बोलण्यापेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न ताबडतोबीने सोडवले पाहिजेत व त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत.भाजपचे राज्य असलेल्या बिहारमध्ये मार्केट कमिट्या व त्यांचे कायदे रद्द झालेले आहेत.त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही व त्यासाठी ते रस्त्यावर उतरलेले आहेत हे या कायद्यातील त्रुटी दाखवा म्हणणाऱ्या कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.या काळ या कायद्यानुसार मार्केट कमिट्या व त्यांचे कायदे बंद होणार आहेत.
कॉम्रेड नामदेव गावडे म्हणाले की शेतकरी सहसा आंदोलनाच्या फंदात पडत नसतो. पण तो एकदा पेटून उठला की मागे हटत नसतो हे केंद्र सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे. शेतकर्यांच्या वाट्याला जाणार्या सरकारचा विनाश अटळ आहे.कॉम्रेड दिलीप पवार म्हणाले की या देशातील कष्टकरी,कामगार, शेतकरी या सर्वांच्या मुळावर हे सरकार उठले आहे.कामगार, असंघटित कष्टकरी यांच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या विरोधात हे सरकार काळे कायदे करून त्यांना नेस्तनाबूत करू पाहत आहे. कॉम्रेड उदय नारकर म्हणाले की चीन आणि पाकिस्तान बॉर्डर वर नसेल इतकी भयानक परिस्थिती आंदोलकांच्या भोवती केंद्र सरकारने केलेली आहे.शेतकरी आंदोलकांच्या वाटेत खिळे ठोकणारे हे जगातील एकमेव सरकार असेल. यावेळेस रघुनाथ कांबळे,चंद्रकांत यादव,वसंतराव पाटील, जयकुमार शिंदे यांची देखील भाषणे झाली.या वेळेस माजी खासदार राजू शेट्टी, समितीचे निमंत्रक नामदेव गावडे,सतीशचंद्र कांबळे, वसंतराव पाटील,चंद्रकांत यादव, उदय नारकर,बाळासाहेब बर्गे, दिलदार मुजावर, इर्शाद फरास,नामदेव पाटील, सम्राट मोरे, गिरीश फोंडे, उत्कर्ष पवार, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, वाय. एन.पाटील, इम्तियाज हकीम, सोहेल मुजावर,शंकर काटाळे, बाबू शेख, मधुकर माने,मधुकर पाटील, अतुल देवकुळे, किरण शिंदे, अण्णा मालेकर बाबा बुचडे, अविनाश साठे,गुंडा घाटगे, जयवंत जोगडे,बाळू राऊ पाटील,सिद्धार्थ कांबळे, गणेश गर्दे, गौरव कुसळेआदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................


Comments
Post a Comment