कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा घेतला आढावा........



 रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिका-यांनी खेड तालुक्यातील धुपेवाडी, गाव वरवेली येथे भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा घेतला आढावा


रत्नागिरी प्रतिनिधी:-

सोमवार दिनांक 22-02-2021 रोजी डॉ.श्रीम.बी.एस. कमलापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी धुपेवाडी, गाव वरवेली, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे भेट दिली. सदर वरवेली गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह 57 केसेस आढळल्या होत्या.  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ग्रामपंचायत सदस्य व तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली, गावातील कोरोना साथरोग प्रादुर्भावाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती घेतली. साथीबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.  यावेळी त्यांचेसोबत डॉ.श्री.शेळके तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.चव्हाण व डॉ.श्री. गेजगे, जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक श्री निलेश गिम्हवणेकर, आरोग्य सहाय्यक श्री.पारधी, आरोग्य सेवक श्री. अजित तटकरे, आरोग्य सेवक श्री. गोवळकर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

..............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन  प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


टिप्पण्या