अभिनेता संदीप नाहरचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासात अंदाज

मुंबई :  एम. एस. धोनी आणि केसरी चित्रपटातील अभिनेता संदीप नाहरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. मात्र संदीपने खरच आत्महत्या केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. मुंबईतील गोरेगाव येथील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये त्यानी स्वत:ला गळफास घेत आत्महत्या केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपच्या पत्नीनं सांगितलं की, संध्याकाळी संदीप आपल्या रुममध्ये गेले आणि त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला. मात्र, खूप वेळ झाला तरी ते बाहेर न आल्यानं पत्नीला संशय आला. तिनं दरवाजा ठोठावला मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं तिनं फ्लॅट मालक आणि संदीपच्या मित्रांना याबाबतची माहिती दिली

Comments