मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करा – भाजपा महिला मोर्चाची तीव्र निदर्शने
(छाया - तय्यब अली) उद्धव ठाकरे जागे व्हा... पूजा ला न्याय द्या, शरद पवार जागे व्हा पूजा ला न्याय द्या, सोनिया गांधी जागे व्हा पूजाला न्याय द्या, अनिल देशमुख जागे व्हा खुनाचा गुन्हा दाखल करा, आघाडी सरकार हाय हाय पूजा ला न्याय द्या, नुसतेच बोलतात गोरे गोरे झाले थोबाड यांचे काळे अशा आशयाचे बोर्ड घेऊन महिला मोर्चा पदाधिकारी यांनी बिनखांबी गणेश मंदिर परिसरात प्रमुख तीन रस्ते आडवून जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी बोलताना महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा गायत्री राउत म्हणाल्या, तीघाडी सरकारमध्ये अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असताना कोणीही पुढाकार न घेता मंत्री राठोड यांची पाठराखण करत आहेत. दडपशाहीचे राजकारण राज्यात होत आहे. पिडीतांवर त्यांच्या नातेवाईकांवर दबाव आणून गुन्हे दाखल करून घ्यायचे नाहीत किंवा मागे घेण्यास भाग पाडायचे यामध्ये मोठे शौर्य मानून सत्तेचा गैरवापर करून स्वत:वर फुले उधळून घ्यायची असे प्रकार सध्या राज्यात सुरु आहेत. राज्यात मंत्री समर्थक गोळा करून विविध कार्यक्रम करत आहेत त्याउलट न्याय मागण्यासाठी, हक्कासाठी सर्वसामान्य लोक रस्त्यावर आले तर त्यांना अटक केली जात आहे. संजय राठोड यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज रास्ता रोको आंदोलन केले जात असून यावर जर सरकार किंवा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला मोर्चाच्यावतीने देण्यात आला. याप्रसंगी प्रमोदिनी हर्डीकर, स्वाती कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर आंदोलन कर्त्या सर्व महिलांना पोलीस प्रशासनाने अटक केली.
याप्रसंगी प्रमोदिनी हर्डीकर, आसावरी जुगदार, विद्या बनचोडे, स्वाती कदम, सुनीता सूर्यवंशी, गौरी जाधव, दीपा ठाणेकर, कार्तिकी सातपुते, संगीता चव्हाण, सीमा बारामते, वंदना नायकवडी, शुभांगी चितारे, शुष्मा गर्दे, मयुरी,विजयमाला जाधव, मयुरी पाटील, जयश्री दबडे, नीलम जाधव आदींसह महिला उपस्थित होत्या.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment