दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन व दि इन्स्टिट्युट ऑफ इंडियन फौंड्रीमेन पहील्या दिवशी विजयी....

 कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने झंवर ग्रुप पुरस्कृत ‘चेंबर चषक’ क्रिकेट स्पर्धा २०२१ मध्ये कोल्हापूर सराफ व्यापारी संघ, दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन व दि इन्स्टिट्युट ऑफ इंडियन फौंड्रीमेन पहील्या दिवशी विजयी....

कोल्हापूर २७ : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कोल्हापूर यांच्यावतीने २०२१ या सालाकरिता सर्व संलग्न व्यापारी व औद्योगिक संघटना यांचेमधील ‘चेंबर चषक’ क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ व चषक अनावरण कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती मध्ये शाहुपूरी जिमखाना, शिवाजी पार्क, कोल्हापूर येथील ग्राउंडवर संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार खासदार संजय मंडलिक यांचा अध्यक्ष मा. संजय शेटे, आमदार चंद्रकांत जाधव यांचा माजी अध्यक्ष मा. आनंद माने, मा. श्री. रामप्रताप झंवर यांचा माजी अध्यक्ष मा. प्रदिपभाई कापडिया व मा. श्री. विद्यानंद बेडेकर यांचा उपाध्यक्ष मा. शिवाजीराव पोवार यांच्या हस्ते करण्यात आला.   

‘चेंबर चषक’ – २०२१ चे अनावरण मा. खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मा. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्याची नाणेफेक व पहिल्या सामन्याचा सामनावीराचा सत्कार मा. श्री. रामप्रताप झंवर यांच्या हस्ते करण्यात आला. क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्याच्या पराभूत संघास ‘सहभाग चषक’ मा. श्री. विद्यानंद बेडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मा. संजय शेटे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर व राजू पाटील, खजानिस हरिभाई पटेल, परदेशी आणि कंपनीचे सुजीत परदेशी, सर्व कार्यकारी संचालक व सर्व असोसिएशनचे पदाधिकारी, संचालक व सहभागी खेळाडू उपस्थित होते. मान्यवरांचे आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन श्री. अंकुश निपाणीकर यांनी केले.                                                                                    पहिल्या फेरीमधील क्रिकेट सामने खालीलप्रमाणे खेळविण्यात आले. 

१) कोल्हापूर सराफ व्यापारी संघ  v/s  दि कन्झ्युमर्स प्रोडक्टस् डिस्ट्रीब्युटर्स वेलफेअर असोसिएशन

२) गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन  v/s  कोल्हापूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट असोसिएशन

३) असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेनर्स  v/s  कोल्हापूर प्लायवूड डिलर्स असोसिएशन

४) दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन  v/s  आय टी असोसिएशन ऑफ कोल्हापूर

५) दि इन्स्टिट्युट ऑफ इंडियन फौंड्रीमेन  v/s   कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन

वरील सामन्यांमधून विजयी संघ पुढील फेरीसाठी खालीलप्रमाणे खेळविण्यात आले.

१) कोल्हापूर सराफ व्यापारी संघ  v/s  कोल्हापूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट असोसिएशन

२) कोल्हापूर प्लायवूड डिलर्स असोसिएशन v/s  दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन

वरील सामन्यांमधून विजयी संघ पुढीलप्रमाणे

१) कोल्हापूर सराफ व्यापारी संघ  

२) दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन

तसेच, पहिल्या फेरीमधील दि इन्स्टिट्युट ऑफ इंडियन फौंड्रीमेन हा विजेता संघ रविवार दि. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी उंपात्यपूर्व सामन्यासाठी दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन  या विजेता संघाशी खेळवला जाईल.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments