भाजपाने लावले महावितरण कार्यालयाला टाळे!!!!!
भाजपाने लावले महावितरण कार्यालयाला टाळे!
कोल्हापूर :दि ५ महावितरणाने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या निषेधार्थ तसेच जळालेला डीपी वीजबील भरल्याशिवाय देणार नाही अशी आडमुठी भूमिका घेणार्याळ महावितरणच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखली संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कार्यालयाला “टाळा ठोको व हल्लाबोल” आंदोलन करण्यात येत आहे. याच विषयासाठी भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली आज शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजी मुख्य महावितरण कार्यालय तराबाई पार्क याठिकाणी सकाळी 11 वाजता जोरदार निदर्शने करून “टाळा ठोको व हल्लाबोल” आंदोलन करण्यात आले.
कोरोनामुळे आधीच जनतेची आर्थिक अडचण निर्माण झाली असून त्यात भर म्हणून महाविकासआघाडी सरकारने वाढीव वीज बिले जनतेवर लादली, ही वीज बिले माफ व्हावीत म्हणून भाजपाने यापूर्वी देखील महावितरण कार्यालयाच्या दारामध्ये वाढीव वीज बिलांची होळी केली होती. वीज बिले माफ न करता महावितरणने ७५ लाख ग्राहकांना १५ दिवसांत विज बिल नाही भरले तर कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवली. याविरोधात आज भारतीय जनता पार्टीने जोरदार निदर्शने करून कोल्हापूर मधील ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारातून आत प्रवेश करत गेट नंबर दोन ला कार्यकर्त्यांनी साखळदंड बांधून टाळे ठोकले.
यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, लॉक डाऊन च्या काळामध्ये काही लोकांचा रोजगार गेला अशा लोकांच्या पाठीशी उभे राहण्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीजबिले दिली. भाजपाने या विरोधात आंदोलन केले त्यानंतर ऊर्जामंत्री यांनी वीज बिलामध्ये पंचवीस ते तीस टक्के सूट देण्याचे खोटे आश्वासन दिले. आता सूट न देता जनतेला वीज बिले न भरल्यास कनेक्शन तोडण्याची धमकी महाविकास आघाडी सरकार देत आहे. याविरोधात भाजपा हे टाळा ठोको आंदोलन करत असल्याचे नमूद केले.
जिल्हा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, महाराष्ट्रा शेजारील काही राज्यांमध्ये लॉकडाऊन काळामध्ये विज बिल माफी करण्यात आली पण महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील साडेचार कोटी जनतेला नोटीस दिली तसेच ७५ लाख नागरिकांना पंधरा दिवसात वीज बिल भरले नाही तर कनेक्शन तोडण्याची धमकी दिली. लॉकडाऊन मुळे जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना अशा प्रकारच्या नोटिसा पाठवून हे महाविकास आघाडी सरकार जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे.
मनोगत व्यक्त करताना किसान मोर्चा अध्यक्ष भगवान काटे म्हणाले, कृषी पंप विषयी देखील विज बिल विषयात खोटे आश्वासन देऊन हे महाविकास आघाडी सरकार राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, लॉकडाऊन काळामध्ये राज्यातील जनतेला विविध योजनेमधून मोदी सरकारने मदत देऊन सहकार्य केले होते पण महाराष्ट्रात असणारे तीन पक्षाचे तीघाडी सरकारने कोणत्याही योजनेतून मदत तर दिलीच नाही याउलट वाढीव वीज बिले देऊन ती बिले भरली नाही तर कनेक्शन तोडण्याच्या धमक्याच नागरिकांना दिल्या. लॉक डाऊनकाळातील वाढीव वीज बिले माफ करावीत यासाठी याआधीही भाजपाने वेळोवेळी आंदोलने व निवेदन दिले आहे. ही वाढीव वीज बिले माफ न करता लोकांना नोटिसा पाठवल्या याविरोधात भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळेठोको हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. महावितरणचे कर्मचारी नागरिकांच्या घरातील वीज कनेक्शन तोडण्यास गेले असता व ते भाजपाच्या निदर्शनात आले तर भाजपा गप्प बसणार नाही याहूनही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला.
महावितरण कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकत असताना पोलीस व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी महाविकासआघाडी सरकार व महावितरण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ठाकरे सरकार सर्वसामान्य जनतेला आणखी किती विजेचे धक्के देणार ?
१) बिल्डरांना प्रीमियम साठी 50% सूट दिली...मग गोरगरिबांची ओढाताण करून त्यांना वीज बिलात सवलत का दिली नाही?
२) कोरोना च्या काळात आपल्याच मंत्र्यांना कार खरेदी करून देण्यास राज्य सरकारकडे बक्कळ पैसा होता... मात्र जनतेला वीज बिलातून दिलासा देण्यास पैसे नव्हते का?
३) ताज हॉटेल चे जवळपास दहा कोटी रुपये माफ केले...
मग सामान्य जनतेचे विजबिल राज्य सरकारने माफ का केले नाही?
४) मद्य विक्रीसाठीच्या शुल्कामध्ये 50% सुट्टी दिली...
मग सामान्य वीज ग्राहकांना सूट देण्यात राज्य सरकारला अडचण काय ?
५) महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो........
या आशयाचे फलक निषेधासाठी कार्यकर्त्यांनी दर्शवले होते..
आंदोलनाचे प्रास्ताविक हेमंत आराध्ये यांनी केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, मारुती भागोजी, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, डॉ.सदानंद राजवर्धन, रविंद्र मुतगी, भरत काळे, संतोष माळी, धीरज पाटील, संजय जासूद, आशिष कपडेकर, अभिजित शिंदे, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, साजन माने, युवा मोर्चा अध्यक्ष विजय खाडे-पाटील, संदीप कुंभार विवेक वोरा, वल्लभ देसाई, गौरव सातपुते, सुमित पारखे, विराज चिखलीकर, गिरीश साळोखे, विशाल शिराळकर, आसावरी जुगदार, विरेंद्र मोहिते, प्रसाद मोहिते, पुष्कर श्रीखंडे, विवेक राजवर्धन, सुनील पाटील, किशोर लाड, आप्पा लाड, दिलीप बोंद्रे, बापू राणे, अमर साठे, महादेव बिरजे, योगेश साळोखे, कविता लाड, मंगला निप्पाणीकर, विद्या बनछोडे, प्रज्ञा मालंडकर, विद्या तेली, ऐश्वर्या जुगदार, चिनार गाताडे, प्रीतम यादव, दिनेश पसारे, सचिन मुधाले, हर्षद कुंभोजकर, पृथ्वीराज जाधव, कार्तिकी सातपुते, सचिन सुराणा, प्रशांत गजगेश्वर, शैलेश जाधव, नरेंद्र पाटील, राहूल रायकर, शशिकांत रणवरे, इकबाल हकीम, भैया शेटके, राजू माळगे, मामा कोळवणकर, प्रवीणसिंह शिंदे, प्रसाद नरुले, तानाजी रनदिवे, मनोज इंगळे, कृष्णा आतवाडकर, अक्षय निरोखेकर, सिद्धार्थ तोरस्कार, महेश यादव, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................


Comments
Post a Comment