नायर रूग्णालयात २८ वर्षीय डॉक्टरची इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या



 नायर रूग्णालयात २८ वर्षीय डॉक्टरची इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या



मुंबई: नायर रुग्णालयातील एका २८ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली. काल मध्यरात्री त्याने स्वतःला इंजेक्शन टोचून घेऊन जीवनयात्रा संपवली. त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.नायर रुग्णालयातील २८ वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्री त्याने स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला असून, विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.



सूत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टर मूळचा औरंगाबाद येथील राहणारा होता. तो काही दिवस रजेवर होता. तो पुन्हा रुजू झाला होता. काल मध्यरात्री खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला. इंजेक्शन टोचून घेत त्याने जीवन संपवले. आत्महत्येमागील कारण कळू शकलेले नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. नायर रुग्णालयात यापूर्वी २०१९ मध्ये डॉ. पायल तडवी हिनेही आत्महत्या केली होती.


हायलाइट्स:
  • नायर रुग्णालयातील २८ वर्षांच्या डॉक्टरची आत्महत्या
  • मुंबईतील धक्कादायक घटना
  • आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही



...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments