पोलीस बॉईज असोशिएयनच्या वतीने जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
कोल्हापूर: पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलसमोर आंदोलन सुरु असून नवीन नियमावलीनुसार महाराष्ट्रातील सोमवारी झिरो तीन ते झिरो चार हजारांच्या आसपास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी घर बांधणीसाठी मागील कर्मचारी लोन मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या मागणीबाबत चे निवेदन मागील आठ महिन्यांपासून म्हणजे जून 2020 वारंवार संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हाधिकारी यांना दिली आहेत. तसेच नागपूर-मुंबई जनता दरबारात देखील संघटनेच्यावतीने वारंवार लोन कधी मिळणार अशी विचारना केले असता, लवकरच काम होईल असे आश्वासन दिलेले होते. परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला दिसून येत नसल्यामुळे, अर्ज दाखल केलेल्या सर्व अर्जदारांनमध्ये चीड निर्माण झाली असून, आमच्या हक्काचे लोन आम्हाला का मिळत नाही असे प्रश्न विचारले जात आहेत.
यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Comments
Post a Comment