जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्यावतीने जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी- माती, ग्रिकोरोमन, वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली या गटात या स्पर्धा झाल्या. शुक्रवार दि. १९  रोजी श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था मंदिर सभा मंडपामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार बाळ माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरेंद्र वणजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय नागेश जागुष्टे, बजाज फिनकाॅर्पचे निनाद घडशी, श्रीकृष्ण विलणकर अध्यक्ष, सदानंद जोशी कार्यवाह, चंद्रशेखर केळकर कार्याध्यक्ष, संतोष कदम, अमित विलणकर, वैभव चव्हाण, योगेश हरचेरकर, अंकुश कांबळे, दिनकर पवार, आनंद तापेकर, फैयाज खतिब, श्रीम. निलम कुलकर्णी, आनंदा सनगरे, राज नेवरेकर हे उपस्थित होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण सौरभ मलुष्ठे यांच्या हस्ते करण्यात आले. डाव प्रतिडावांनी रंगलेल्या या स्पर्धेतून प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे(अनुक्रमे विजेता,उपविजेता) 57 किलो गटात किरण किशोर घाग, अतुल अरूण गराडे, 61 किलो गटात प्रथमेश महादेव कुळये, साहिल अरूण गराटे,  65 किलो गटात जैद अक्रम शेख, प्रशांत विष्णु रेवाळे, 70 किलो गटात योगेश विजय हर्चेकर, मिलिंद सुनिल शेलार, 74 किलो गटात संदिप रघुनाथ गुरव, ऋषिकेश रमाकांत शिगवण, 74 किलो गटात साहिल सतीश खटकुळ, अनिकेत अनिल गोरविले, 86 किलो गटात मारूती यशवंत बिर्जे, प्रतिक धर्मेंद्र चव्हाण, 92 किलो गटात आनंद श्रीपती तापेकर, रोहन विलास वाडेकर, 97 किलो गटात सुयोग दत्तात्रय कासार, अंकुश रविंद्र भुवड, 86 ते 125 किलो गटात अभिषेक अनिल गोरीवळे, श्रीकांत महेश सकपाळ विजयी झाले.

..............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन  प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments