साईक्रुपा कर्णदान अपंग सेवा संस्थेमार्फत आरोग्य सेवा सुविधा केंद्र (दवाखाना)सुरू.

मिरज:-  ( प्रतिनिधी ) १९९३पासून भटक्या विमुक्त जाती, जमाती च्या सक्षमीकरणासाठी स्थापित झालेल्या " साईक्रुपा कर्णदान अपंग सेवा संस्थेस '',""भारत निती आयोगाची मान्यता ''असून संस्थापक अध्यक्ष मा.शिवाजीराव मोरे ,यांच्या नेतृत्वाखाली दोन "बालकामगार.''मुलांच्या शाळा कार्यरत आहेत.मुलांच्या सक्षमीकरणा बरोबर कुटुंबाचेही आरोग्यीक सक्षमीकरण व्हावे याकरिता पूर्व अभ्यास करून, माधवनगर बायपास रोड,मुख्य होमगार्ड आँफीसजवळ असणाऱ्या बालकामगार मुलांच्या शाळेत "आरोग्य सेवा सुविधा केंद्र''(दवाखाना)सुरू करून. आज रविवार दि.२८/०२/२०२१ डॉ. सोमशेखर पाटील, डॉ.भोमाज,व डाँ.कुलकर्णी यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून "आरोग्य शिबीर'संपन्न झाले. जवळजवळ ८५ रूग्णांना तपासून ,त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.गौतम प्रज्ञासूर्य (सर)यांनी केले. तर स्वागत मा.रवींद्र काळे खजिनदार यांनी केले, प्रस्तावना मा.शिवाजी मोरे यांनी मांडली नंतर कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. पाटील,डॉ, कुलकर्णी व डॉ, भोमाज सर यांनी संस्थेच्या कार्याविषयी आपले विचार मांडून, शुभेच्छ्या दिल्या.आरोग्य शिबिरात मा.सिद्धाप लोंढे, आय टेक्निशियन यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. 

सदर प्रसंगी मा.राकेश तामगांवे, मा.शशिकांत मोरे,सौ,निर्मला मोरे,सौ,चिकणे मँडम, मा.सावंत सर,मा.जोगदंड ,मा.सचिन सकरे,व राजू बनसोडे हजर होते. शेवटी आभार मा.राकेश तामगांवे यांनी मांडले. व दवाखाना उद्घाटन व आरोग्य शिबिर संपन्न झाले.


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments