सध्या रिक्षाच्या व्यवसायात आता भाडे वाढ नको
(छाया - तय्यब अली)
कोल्हापूर :- (प्रतिनिधी) मा. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना ऑटोरिक्षा संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्या संदर्भातले निवेदन देण्यात आले. सध्या रिक्षाचा व्यवसाय पाहता भाडेवाढ नको. पेट्रोल, डिझेल, एलपीजी चे दर कमी करावे. रिक्षा करीता, पेट्रोल, डिझेल, एलपीजी कमी दरात उपलब्ध करून द्यावेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर शहरात सीएनजी पंप सुरू करावेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी होत असताना, भारतात मात्र पेट्रोल, डिझेल व एलपीजी च्या दरात दरोज वाढ होत आहे. व राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरातील अतिरिक्त कर रद्द करून, रिक्षाचालकांना कमी दरात पेट्रोल व डिझेल तसेच उपलब्ध करून द्यावे. कोरोनाचा प्रभाव वर्षानंतर कमी होत आला. जनजीवन पूर्वपदावर येत असताना, कोरोनाने पुन्हा आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली असून, परत आपण लॉकडाउनच्या दिशेने जात आहोत. कोल्हापूर शहर व जिल्हा आणि मुंबई महानगर परिक्षेत्र परिसरात रिक्षा व्यवसायात खूपच तफावत आहे. दुचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस सतत वाढतच आहे. त्यामुळे रिक्षा प्रवासी यामध्ये भाडे वाढ केल्यास रिक्षात प्रवासी बसणार नाहीत. त्याचप्रमाणे शहरातून शेअर रिक्षा पद्धतीने रिक्षा व्यवसाय सुरू असून, मीटरप्रमाणे रिक्षा व्यवसाय फक्त 20 टक्के चालू आहे. रिक्षा भाडे वाढ झाल्यास, मीटरमधील फेरबदल करण्यास किमान 1000 रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे भाडेवाढ देण्याचे झाल्यास,सर्व रिक्षा संघटनांच्या प्रमुखांची बैठक बोलावून निर्णय घ्यावेत. त्याचप्रमाणे रिक्षा मीटर फेरफार न करता टेरिफ कार्ड वापरण्यास परवानगी द्यावी. अशा आशयाचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीवन अल्वारिस यांना समितीचे सेक्रेटरी सुभाष शेटे तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी श्री शिवाजी पाटील, ईश्वर चेन्नी, अरुण घोरपडे, बाळासो सादिलगे, राजू थोरवडे, विश्वास नांगरे, मधु सावंत, शरफुद्दीन शेख, महादेव विभुते आदी उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment