साडवलीत गतिमंद मुलीवर बलात्कार!
गतिमंद मुलीवर बलात्कार प्रकरण: दोघांना न्यायालयीन कोठडी
साडवली : संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गावातीलच दोन सख्खा भावांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दत्तात्रय लवू रहाटे (३१) व गणेश लवू रहाटे (३०) या दोन सख्ख्या भावांनी दि. १९ मार्च २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीत शेजारी राहणाऱ्या गतिमंद मुलीशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले होते. यातून ही पीडित मुलगी गरोदर राहिली. या प्रकरणी मुलीच्या आईने देवरूख पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दत्तात्रय रहाटे व गणेश रहाटे या दोन संशयित तरुणांना अटक केली होती. या नंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची पंधरा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा