रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) सांगली जिल्हा युवक आघाडीचे उपोषण आंदोलनाचा विजय.:- रिपाइं सांगली जिल्हा व शहिद भगतसिंह झोपडपट्टी, चंदनवाडी झोपडपट्टी व हैदरखान विहीर झोपडपट्टी यांचे पुणर्वसनासाठीचे आंदोलन मध्य रेल्वेच्या लेखी आश्वासना नंतर स्थगित.
शहिद भगतसिंह झोपडपट्टी वसाहत, चंदनवाडी झोपडपट्टी वसाहत व हैदरखान विहिर मठ झोपडपट्टी वसाहत येथील रहिवासी नागरिक रोजंदारीवर मिळेल तेथे काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहे. येथील रहिवासी नागरिकांनी स्वकष्टाने उण-वारा-पाऊस या पासुन बचावाकरिता स्वतःसाठी व कुटूंबासाठी तातपुर्ते आसरे बांधले आहेत. आणी हया गोरगरिब कष्टकरी जनतेची घरे कोणतीही पुर्वसुचना न देता, कोणताही पत्रव्यवहार नकरता मध्य रेल्वे पुणे विभागाने सरळ या तिन्ही वसाहतीमधील रहिवासी जनतेला घरेपाडण्याचा आदेश देणे हे कायद्या विरोधी कृत्य असुन प्रतेक भारतीय नागरिकांच्या संविधानिक अधिकारानूसार येथील रहिवासी जनतेच्या कोणत्याही प्रकारचे पुणर्वसन नकरता घरेपाडण्याचा आदेश देणे हे निषेधार्थ बाब असुन रिपब्लिकन पक्ष या गोरगरिब जनतेवर होणारा हा अन्याय कद्यपी सहन करणार नसुन या अन्यायाच्या विरूद्ध भारतीय नागरिक संविधानिक अधिकारानुसार रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) सांगली जिल्हा व शहिद भगतसिंह झोपडपट्टी वसाहत, चंदनवाडी झोपडपट्टी वसाहात व हैदरखान विहिर मठ झोपडपट्टी येथील रहिवासी मिळून आज मंगळवार दि. २३/०२/२०२१ रोजी सकाळी ११-०० वा. पासुन आम्रपाली बोधीवृक्ष मिरज रेल्वे जंक्शन येथे रिपाइं चे युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. अशोकरावजी कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा सरचिटनीस मा.डॉ . रविकुमार रामभाऊ गवई, मिरज शहर उपाध्यक्ष मा. सुनिल मनोहर माने, मा. सुरेश भूपाल गाडे, व मा. सलिम काशीम लोंगे यांनी उपोषण आंदोलन सर्व प्रशासनाचा विरोध झुगारून सुरू करणेत आले होते. यावेळी गांधी चौक पोलिस ठाणे, रेल्वे पोलिस फोर्स(आर.पी.एफ), जनरल रेल्वे पोलिस फोर्स (जी.आर.पी.एफ), व मिरज शहर पोलिस ठाणे यांचा मोठा फौजफाटा तैनात करणेत आला होता. दरम्यान त्वरित या उपोषण आंदोलनाची दखल घेऊन मध्य रेल्वेचे प्रशासकीय अधिकार्यांनी मा. अशोकरावजी कांबळे साहेबांना चर्चे करीता आमंत्रीत केले. व चर्चे दरम्यान मा. अशोकरावजी कांबळे साहेबांनी तिन्ही झोपडपट्टीवासी जनतेची व्यथा रेल्वे अधिकार्यांसमोर मांडून जो पर्यंत ह्या माझ्या गोरगरीब जनतेला सन्मानाने न्याय मिळतनाही, व या झोपडपट्टीवासीयांचे पुणर्वसन निर्णय होत नाही तेंव्हापर्यंत आंदोलन स्थगीत होणार नाही असा पावित्रा घेताच मध्य रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून लेखी आश्वासनाद्वारे उपोषण आंदोलन स्थगीत करणेत यावे अशी विनंती केली.उपोषण आंदोलनास बसलेले मा.डॉ. रविकुमार गवई, मा. सुनिल मनोहर माने, मा. सुरेश भुपाल गाडे, मा. सलिम काशीद लोंगे यांना रेल्वे अधिकारी, रिपाइं व्हि.जे.एन.टी. आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. सतिश जाधव, बहूजन विद्यार्थी परिषदेचे युवा नेते मा. श्वेतपद्म कांबळे, रिपाइं महिला आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्षा मा. सौ. छायादीदी सर्वदे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. बापू सोनवणे, युवक आघाडीचे सांगली जिल्हा सरचिटनीस मा. अरूण आठवले व महिला आघाडीच्या जत तालूका-उपाध्यक्ष मा, अंबिका मासाळ यांचे हस्ते ज्युस देऊन आंदोलन स्थगीत करणेत आले.यावेळी रिपाइं(आठवले) माहिती तंत्रज्ञान आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्रभाऊ कांबळे, मिरज शहराध्यक्ष मा. अविनाश कांबळे, कामगार आघाडीचे सांगली जिल्हा-उपाध्यक्ष मा. मारूती धोतरे, युवक आघाडीचे मिरज शहराध्यक्ष मा. संदिप दरबारे, मिरज शहर उपाध्यक्ष मा. शानूर पानवाले, मिरज शहर संपर्क प्रमुख मा. प्रमोद वायदंडे, मिरज शहर उपाध्यक्ष मा. हनमंत कांबळे, मा. आकाश कांबळे, रिपाइं चे प्रवक्ते मा. गौतम प्रज्ञासुर्य सर, युवक आघाडीचे जत तालूकाध्यक्ष मा. संमेक कामत, कुपवाड शहराध्यक्ष मा. संतोष सर्वदे, मा. राम कांबळे, रिपाइं मिरज शहरचे कोषाध्यक्ष मा. संजय कांबळे, मा. मोजेस ॲंथोनी, मा. त्रिदल वाघमारे, मा. संतोष वाघेला, मा. भिमराव नडोनी, मा. शंकर बडची, जयवंत कांबळे, मा. शिवाजी नडोनी, यांचे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी नागरीक उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment