चिपळूणला अनोख्या प्लास्टिक भिशीचे आयोजन
चिपळूण : येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि डाऊ केमिकल इंटरनॅशनल तसेच चिपळूण पालिकेच्या सहकार्याने चिपळूण येथे येत्या ७ फेब्रुवारीला अनोख्या प्लास्टिक भिशी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूणच्या मुख्य एसटी स्थानकाजवळ ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात दुपारी ३ वाजता या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. कार्यक्रमात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व सहभागी लोकांकडून प्लास्टिक जमा करून घेतले जाईल. या प्लास्टिकमध्ये घरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या साफ केलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरी बॅग, लहान मुलांची मोडकी खेळणी, मोडकी खुर्ची, पाण्याच्या बाटल्या इत्यादी कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक घेतले जाईल. भिशीमध्ये कोणीही व्यक्ती नावनोंदणीशिवाय थेट एक किलो प्लास्टिक घेऊन सहभागी होऊ शकेल. प्लास्टिक घेतानाच प्रत्येकाला १ किलो प्लास्टिकमागे दहा रुपये रोख आणि एक कुपन दिले जाईल. प्लास्टिक जमा केल्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल. त्याच वेळी उपस्थितांना प्लास्टिक कचरा निर्मूलनाचे महत्त्व सांगितले जाईल. सायंकाळी ५ वाजता सर्वांच्या समोर भिशीची सोडत काढली जाईल. मान्यवरांच्या हस्ते सोडत काढून विजेता निवडण्यात येईल. भिशीमध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग असावा, या उद्देशाने प्रथम विजेत्याला एक हजार रुपयांची साडी बक्षीस देण्यात येईल. तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही काढण्यात येतील. सोडतीचा कार्यक्रम सर्वांसमक्ष आणि पूर्णपणे पारदर्शक असेल. तसेच सर्व बक्षिसे त्याचवेळी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येतील. कार्यक्रमासाठी डाऊ केमिकल इंटरनॅशनलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्लास्टिक भिशीबाबत अधिक माहितीसाठी भाऊ काटदरे (९४२३८३१७००), राम मोने (९४२०१५१७००), उदय पंडित (९८८१५७५०३३) यांच्याशी त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकांवर संपर्क करावा. या अनोख्या प्लास्टिक भिशीमध्ये चिपळूणमधील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्रच्या वतीने करण्यात आले आहे.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536

Comments
Post a Comment