पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले मंत्री "संजय राठोड"?
मुंबई – पुण्यातील २२ वर्षीय तरूणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत, काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप लागले होते, हे प्रकरण संपत नाही तोवरच या मुलीच्या आत्महत्येवरून आणखी एक कॅबिनेट मंत्री अडचणीत सापडले आहेत. या कथित मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तरूणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे, नेमकं हा मंत्री कोण? अशी चर्चा सोशल मीडियात सुरू होती.
परंतु भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोड या मंत्र्यांचे नाव घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राठोड हे राज्यातील ठाकरे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आहे, यवतामळमधील शिवसेनेचे आमदार आणि राज्यातील मंत्रिमंडळात वनमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. संजय राठोड यांचे नाव पहिल्यांदाच उघडपणे या प्रकरणात समोर येत आहे. बंजारा समाजाचे नेते म्हणून संजय राठोड यांची ओळख आहे, त्याचसोबत यवतमाळमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणारे आक्रमक शिवसैनिक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.
संजय राठोड:
-महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांनी वनमंत्री म्हणून शपथ घेतली.
-यवतमाळ जिल्हा काँग्रेसमय असताना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन संजय राठोड शिवसेनेत आले.
-१९९० ते २००० दरम्यान यवतमाळ मध्ये तरूण तडफदार चेहरा म्हणून शिवसेनेचं काम केले.
-यवतमाळमध्ये काँग्रेसचं वर्चस्व असताना वयाच्या २७ व्या वर्षी शिवसेनेचं यवतमाळ जिल्हाप्रमुखपद त्यांना मिळालं.
-१९९७ पासून ते २००४ पर्यंत कठीण संघर्षातून संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून ते पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले.
-२००९ मध्ये दिग्रस मतदारसंघातून बाजी मारत काँग्रेसच्या संजय देशमुखांचा पराभव केला, २०१४ मध्ये पुन्हा निवडून येत संजय राठोड यांनी विजयाची हॅट्रिक साधली, तर २०१९ मध्येही संजय देशमुख यांचा पराभव करून पुन्हा आमदार झाले.
-संजय राठोड हे कायम राजकीय भूमिकांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात चर्चेत राहिले, कधी डान्स तर कधी सायकल चालवणं,तर विजयानंतर उदयनराजेंसारखी कॉलर उडवलेली दृश्य पाहायला मिळाली.कांदळवन कक्ष मुंबई यांनी इतर विभागांशी समन्वय ठेवून नागवाडी छेडानगर ,चेंबूर येथील पत्र्याच्या सहाय्याने कांदळवन क्षेत्रावर अतिक्रमण करून उभारलेल्या सुमारे ४५० झोपड्या निष्कासित केल्या. कांदळवन क्षेत्रावरील असे इतर अतिक्रमण तात्काळ काढणेच्या सूचना संबधितांना दिल्या आहेत.
कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला
मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी
आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
.......................................
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क साधा :9529501121/9529880144
कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.
Comments
Post a Comment