शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला


 कोल्हापूर :  शिवाजी पेठेतील सर्व मान्यवर व माता-भगिनी यांच्या हस्ते शिवजन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवरायांच्या पाळणा सोहळा संपन्न झाला. यावेळी उभा मारुती चौक येथे फटाक्यांची मोठी आतषबाजी करीत आणि अत्यंत मंगलमय वातावरणात शिवजन्म सोहळा पार पडला. 
(छाया - तय्यब अली)

  यावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे साहेब, डीवायएसपी. चव्हाण साहेब, पाटोळे साहेब, पीएसआय. प्रमोद जाधव साहेब, प्रांत ठोंबरे साहेब मंडळाचे अध्यक्ष सुजित भाऊ चव्हाण, उपाध्यक्ष अजित राऊत, सचिव महेश जाधव, चंद्रकांत साळोखे, अजित खराडे, मोहन साळुंके, नाना गायकवाड, चंद्रकांत जगदाळे, रविकिरण इंगवले तसेच उत्सव कमिटीचे अध्यक्ष विशाल भोंगाळे, उपाध्यक्ष सुरज आमते, अभि शिंदे, पंडित बोंद्रे, सुरेश गायकवाड अशोकराव साळुंखे, चंद्रकांत कांबळे, राजेंद्र सरनाईक, राजेंद्र चव्हाण, चंद्रकांत यादव, राजेंद्र चोपदार, माजी उपमहापौर विक्रम जरग, चंद्रकांत पाटील, विकास साळुंखे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, रुपेश इंगवले, योगेश इंगवले, उत्तम कोराणे,  आनंदराव ठोंबरे, प्रसाद चव्हाण, दिलीप सूर्यवंशी, सदाशिव चव्हाण, तेजस मोरे, अजिंक्य दळवी तसेच मरगाई गल्ली भजनी मंडळ, महिला मंडळ, पेठेतील भगिनी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हा पोलीस प्रमुख बलकवडे साहेब, शहर डिवाइस. पी चव्हाण साहेब, प्रांत ठोंबरे साहेब, प्रमोद जाधव साहेब, शशिकांत पाटोळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कोरोनाच्या महामारी मुळे शिवजयंती उत्सवाची मिरवणूक यावेळी रद्द करण्यात आली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुजित भाऊ चव्हाण व उत्सव कमिटीचे अध्यक्ष विशाल भंगाळे यांनी जाहीर केले.


 

...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments