दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास:कवितांचा मेळाव!
राजा शिवछत्रपती
नथ
सुनबाई नाकावर
नको राग क्षणोक्षणी
लक्ष्मी तू या घराची
रहा प्रसन्न वदनी !
नथ आरोग्यदायिनी
दाह नाकाचा हो शांत
त्रास मासिक धर्माचा
झोप लागते निवांत !
शोभे नऊवारी साज
वर शेला पेशवाई
नथ टपोऱ्या मोत्यांची
खुलविते साज बाई !
सुवर्णात जडती गं
मोती -हिरे नि माणिक
लाल - गुलाबी -हिरवा
रंग खड्यांचे कितीक !
आधुनिक वेषातही
नथ खुलवी चेहरा
तरुणींना मोहवतो
कसा नथीचा नखरा !
सौ . माधुरी डोंगळीकर
──────────────────────────────────────────────────────────
अहंकार
ग ची बाधा होता क्षणीच
अहंकारही वाढीस लागतो
मानवता धर्म विसरून मग
मानव कसा मदमस्त वागतो . !1!
ध्यान,आसन, प्राणायामाने
षडरिपूंवर अंकुश ठेवावा
अहंकार हा शत्रू माणसाचा
नम्रतेचा गुण अंगीकारावा .!2!
आत्मघाती अहंकाराने होई
मानवी आयुष्याचे पतन
अहंकार सोडून मानवा तू
नैतिक मूल्याचे कर जतन. !3!
अहंकाराने नात्यात दुरावा येई
अहंकारापायी रावणाचा विनाश
उगीच का मनात तुझ्या अहंभाव
मधुर वाणीने जोड तू प्रेमाचे पाश.!4!
सौंदर्य ,विद्वत्ता , श्रीमंती वैभव
कालपरत्वे सर्वकाही बदलते
तुच्छ नकोस समजू इतरांना
कधी दैवचक्र उलटेही फिरते.!5!
सौ.शारदा मालपाणी
(काव्य शारदा)©️®️




Comments
Post a Comment