रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन*
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देणेत आले. यावेळी मोर्चाच्या संयोजिका व महिला अत्याचार समितीच्या अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढाच जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडला.
मायक्रोफायनान्स कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने दिलेले कर्ज, व अन्यायी कर्ज वसुली, त्याच बरोबर संजय गांधी निराधार योजना, देवदासी पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना, यांचे प्रश्न, आपत्तीग्रस्तांचे पुनवर्सनाचे प्रश्न, महापुरात राहून गेले सर्वेक्षण तसेच नवविवाहिता मृत धनश्री मधाळे हत्याप्रकरणी गुन्हा नोंद होऊनही आरोपीला अटक होत नाही, यासह अशा अनेक प्रश्नांचे गाऱ्हाणे आपल्या निवेदनातून मांडण्यात आले.
यावेळी ग्रामविकास मंत्री नाम.हसन मुश्रीफ यांच्याशीही जिल्हाधिकारी यांच्यासमोरच चर्चा करणेत आली. मुश्रीफ साहेबांनीही यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय जिरगे, जिल्हा संघटक दिलीप कोथळीकर, बाजीराव जैताळकर, प्रताप बाबर, RPI भुदरगड तालुका अध्यक्ष नामदेव कांबळे, पूरग्रस्त संघटना रघुनाथ पाटील, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या व आंदोलक उपस्थित होते.


Comments
Post a Comment