मल्हार सेना यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना "जातवार" नोंदीसाठी निवेदन
कोल्हापूर: 2021 मध्ये होणारी जनगणना "जातवार" नोंद व्हावी, याकरिता मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना मल्हार सेना वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी गलांडे साहेब यांनी निवेदन स्वीकारले. स्वातंत्र्यपूर्व काळी व स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा प्रत्येक दशकाच्या वर्षात, प्रत्येकाची खानेसुमारी होती. त्यात लोकांची सुद्धा (छाया- तय्यब अली) जनगणना होते. तसेच पशुपक्ष्यांची वनचर प्राण्यांची
सुद्धा होते. या पशू गणनेमध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव,शेळ्या, मेंढ्या इत्यादीची वर्गवारी सह गणना होते. कोंबड्यांची गणना होते. म्हणून चार पशूंच्या गणनेही वाघ, सिंह अस्वल, हरणे इत्यादींची सुद्धा वर्गवारी सह गणना होते. म्हणूनच लोकांची सुद्धा जातवार जनगणना होणे आवश्यक वाटते. तसेच प्रत्येक राष्ट्राच्या जडणघडणीत व विकास प्रक्रियेमध्ये जनगणनेचे फार महत्त्व आहे. सर्वांना समान संधी मिळावी, हे आपल्या राज्यघटनेचे मूळ तत्त्व आहे. राष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये घटनेप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, खुला वर्ग असे चार घटक आहेत. भारताच्या लोकसंख्या मध्ये 52 टक्के मागासवर्गीयांची लोकसंख्या आहे.असे सांगितले जाते. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या 73 वर्षांच्या काळानंतर सुद्धा या 52 टक्के मागासवर्गीयांचा म्हणावा असा विकास झाला असे अजिबात वाटत नाही. राजकारण व प्रशासन अर्थकारण शिक्षण यासह निर्णय प्रक्रियेमध्ये मागासवर्गीयांचा हिस्सा नगण्य दिसून येतो. ज्यांनी सत्ता व सवलती भोगल्या, त्याच जाती वारंवार सवलती भोगत आहेत. 52 टक्के मागासवर्ग मात्र सत्तेच्या निर्णय प्रक्रियेपासून अजूनही दूर ठेवला गेला आहे. या सर्वांमुळे मागासवर्गीयांमध्ये सुद्धा प्रचंड असंतोष आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील धनगर समाजाची सुद्धा "जातवार" जनगणना झाली तरच आमच्या मागण्यांची व प्रश्नांची सोडवणूक होऊ शकेल अशी आमची ठाम समजूत आहे. असे वक्तव्य श्री बबनराव रानगे ₹अध्यक्ष सरसेनापती मल्हार सेना महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने माध्यमांशी बोलताना करण्यात आले.
यावेळी छगन नांगरे राघू हजारे, बयाजी शेळके, बाळासाहेब धायगुडे, बाबुराव बोडके, दत्ता बोडके, विक्रम शिनगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment