संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात २८० विंधन विहिरींना मंजुरी





संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात २८० विंधन विहिरींना मंजुरी


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील ३९१ गावांतील ५८५ वाड्यांची तहान भागवण्यासाठी तब्बल १५ कोटी ९४ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या संभाव्य टंचाई कृती आराखड्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याबरोबरच पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने २८० विंधन विहिरींना मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर नळ दुरुस्तीसाठी १२ कोटी ७८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातून २४९ योजना दुरुस्त होणार आहेत.


...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments