आधी फेसबुकवरुन मैत्री नंतर व्हॉट्सअपवर अश्लिल व्हिडीओ चॅट.. अन् त्यानंतर ब्लॅकमेलचा फोन!!!!
आधी फेसबुकवरुन मैत्री नंतर व्हॉट्सअपवर अश्लिल व्हिडीओ चॅट.. अन् त्यानंतर ब्लॅकमेलचा फोन
सोलापूर:सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे. या सोशल मीडियाच्या गुन्हेगारीचे सर्वाधिक प्रमाण हे सायबर गुन्ह्यांचे आहेत. या आधी बँकेतून कॉल करतोय असे म्हणत अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. मात्र, आता या सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत तरुण. तरुणांना लैंगिक आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढलं जातं आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात.
तुम्ही फेसबुक वापरताना अचानक एका अनोळखी महिलेची रिक्वेस्ट येते. तुम्ही रिक्वेस्ट स्विकारता, चॅटिंग होते, चॅटिंग वाढत जाते मग फेसबुकवरची ही चॅटिंग पोहोचते थेट वॉट्सअप पर्यंत. आधी सहज बोलणं होतं आणि मग सुरू होते गुन्हेगारी आणि या गुन्हेगारीला सर्वात जास्त बळी पडतायत ते तरुण. ऑडिओ कॉलनंतर व्हिडीओ कॉल केले जातात. या व्हिडीओ कॉलवर तरुणाला अश्लील कृत्य करण्यासाठी उत्तेजित केलं जातं आणि नंतर तेच व्हिडीओ पाठवून त्याला ब्लॅकमेल केलं जातं.
सोलापुरातील जवळपास 3 ते 4 तरुणांची अशी फसगत झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आपल्या इज्जतीला घाबरून कोणीही पुढे यायला धजावत नाहीये. सामाजिक कार्यकर्ते असलेल्या राज सलगर याने यासंदर्भात फेसबुक पोस्ट टाकली आणि जाळ्यात ओढला जाणारा एक तरुण समोर आला आणि त्याने संपूर्ण व्यथा मांडली.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
.......................................
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क साधा :9529501121/9529880144
कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.


Comments
Post a Comment