खदीजा व खातून विद्यालय गोवळकोट येथे जागतिक मराठी राजभाषा दिवस उत्साहात संपन्न
खदीजा व खातून विद्यालय गोवळकोट येथे जागतिक मराठी राजभाषा दिवस उत्साहात संपन्न
चिपळूण:-गोवळकोट एज्युकेशन सोसायटी, संचलित,खदीजा इंग्लिश मिडीयम स्कुल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कुल,गोवळकोट या विद्यालयात नुकताच २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिवस नुकताच उत्साहात संपन्न झाला.महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
असे प्रास्तविक विद्यालयाचे मराठी विभागप्रमुख श्री.योगेश पेढांबकर यांनी केले.कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयामध्ये फुलपाखरू या विद्यार्थ्यांनी स्वलिखित बनविलेल्या लेखन साहित्याचे भित्तीपत्रक उदघाटन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब यांच्याहस्ते करण्यात आले. मराठी दिनाचे औचित्य साधून इ.५वी ते१० वी पर्यंत सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सुरवातीला इ.९वीची विद्यार्थ्यांनी कु.रुषदा परकार हीने मराठी राजभाषादिनाविषयी माहिती व कणा कविता उत्तमरीत्या सादर केली.तसेच इ.६वी ची कु.अलविना परकार हिने आपल्या शैलीत भाषण केले.
क्लिक करा आणि वाचा:ही कविता नसून औषध आहे, डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी!
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.खुर्शीद शेख यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाप्रसंगी गोवळकोट एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.खुर्शीद शेख, मराठी विषय शिक्षक श्री.योगेश पेढांबकर,सौ.नेहा लटके,सौ.सुजाता पाटील ,कलाशिक्षक श्री.उदय मांडे तसेच विद्यालयातील उपस्थित विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
क्लिक करा आणि वाचा: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.....
मनोरंजन
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुपऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते!
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
Comments
Post a Comment