सरपंच निवडीमध्ये महाविकास आघाडीची बाजी
सरपंच निवडीमध्ये महाविकास आघाडीची बाजी
कोल्हापूर : जिल्ह्यातील कागल हातकणंगले गगनबावडा राधानगरी आजरा व चंदगड तालुक्यात सरपंच निवड झाली. यामध्ये प्रामुख्याने गावपातळीवरील निवडणुकीत विकास आघाडी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे .160 ग्रामपंचायतींची सरपंच व उपसरपंच यांची नियुक्ती काल झाली. यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस व स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. वैयक्तिक पातळीवर सर्वाधिक राष्ट्रवादीला 36 शिवसेनेला 20 भाजपला 15 तर काँग्रेसला 9 सरपंचपदी मिळाली कागल तालुक्यात राष्ट्रवादी सर्वाधिक सरपंच पदे मिळवून आघाडीवर आहे. या ठिकाणी 31 सरपंचपदे राष्ट्रवादीला मिळाली आहेत.
जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींना स्थानिक विकास आघाडीना सरपंच पद मिळाले आहेत. काँग्रेसचे अनेक सरपंच हे स्थानिक आघाड्यानाच वाटून गेल्याचे दिसते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षीय महाविकास आघाडीला मोठे यश मिळवून दिले आहे. तसेच खासदार संजय मंडलिक, संजय बाबा घाडगे, आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिवसेनेला शिवसेनेला उभारी दिली आहे. त्याचबरोबर भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाडगे यांनी ही भाजपला यश मिळवून दिले आहे एकूणच जिल्ह्यातील सर्व पक्षांनी आपले अस्तित्व दाखवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याचे दिसते.
दैनिक फ्रेश न्यूज
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क साधा :9529501121/9529880144
कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.


Comments
Post a Comment