इंधन दरात पुन्हा वाढ !? अर्थमंत्री सीतारामन यांचे इंधन दरांबाबत सूचक विधान, म्हणाल्या...

  

 इंधन दरवाढ ; अर्थमंत्री सीतारामन यांचे इंधन दरांबाबत सूचक विधान, म्हणाल्या...


चेन्नई:पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केंद्र सरकारसाठी अडचणीचा मुद्दा ठरत आहे. इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर विरोधीपक्षांकडून टीका करण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेल भाववाढीबाबत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाचे विधान केले आहे. चेन्नई सिटिजन फोरमने आयोजित केलेल्या अर्थसंकल्पपश्चात चर्चासत्रात सीतारामन बोलत होत्या.

इंधन दरवाढीवरुन सीतारामन यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की,देशातील इंधन दरवाढ हा सध्या अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे. इंधन दराची सध्याची स्थिती हाताळणे अवघड  आहे,असे सीतारामन यांनी सांगितले. दरवाढीने केंद्र सरकारविरोधात टीका संतापाची भावना आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात पेट्रोल-डिझेल मिळावे,यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी पुढाकार घ्यायाला हवा. त्यानी इंधन कर कमी केल्यास इंधन स्वस्त होईल, असे सीतारामन यांनी सांगितले.


इंधनावावर केंद्र आणि सरकारचा प्रचंड कर आहे. पेट्रोल दराच्या जवळपास ६० टक्के आणि डिझेल दराच्या ५४ टक्के रक्कम कर स्वरूपात केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरित जमा होते. त्यामुळे सरकारकडून इंधन दरवाढ रोखण्यासाठी शुल्क कपातीसारख्या उपाययोजनांचा अवलंब करण्यास चालढकल केली जात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

सलग १२ दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ केली आहे. यामुळे दोन शहरात पेट्रोल १०० रुपयांवर गेले असून डिझेलने विक्रमी स्तर गाठला आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली. दरवाढीने महागाईचा विकास होत आहे, असा टोला गांधी यांनी लगावला.

केंद्र सरकारने तातडीने डिझेलवरील कर कपात करून डिझेल स्वस्त करावे, अशी मागणी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष बाल मलकीत सिंह यांनी केली. मूल्यवर्धित करात कपात करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकाराना तत्काळ निर्देश द्यावेत, असे सिंह यांनी सांगितले. १४ दिवसांत केंद्र सरकारने हा निर्णय घेतला नाही तर देशभर माल वाहतूकदार चक्क जाम करतील, असा इशारा त्यांनी दिला.


...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments