भारताने 6 गड्याच्या मोबदल्यात पहिल्या दिवशी 300 रन्स बनवल्या
भारत आणि इंग्लंड दरम्यानचा हा दुसरा कसोटी सामना आहे. चार सामन्यांच्या मालिकेत पहिली कसोटी जिंकत इंग्लंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताने 6 गड्याच्या मोबदल्यात पहिल्या दिवशी 300 रन्स बनवल्या आहेत. आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे रोहित शर्माचे शतक. रोहितने 161 धावा करून तो मोठा फटका मारण्याच्या नादात मोईन अली कडे झेल देऊन बाद झाला. रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणे 67 धावा बनवत रोहितला चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 300 धावा बोर्डावर लागल्या होत्या. व ऋषभ पंत 33 व अक्षर पटेल 5 धावावर खेळत आहेत.

Comments
Post a Comment