इतिहासाच्या पाऊलखुणा! जामखेडच्या खर्डा किल्ल्यात सापडले 250 तोफगोळे!!!

 


इतिहासाच्या पाऊलखुणा! जामखेडच्या खर्डा किल्ल्यात सापडले 250 तोफगोळे




अहमदनगर:अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथे असलेल्या सुलतान दुर्ग          किल्ल्यामध्ये तब्बल 250 तोफगोळे आणि तोफेचा फुटलेला भाग आढळून आला आहे.
                    खर्डा येथे 1795 साली मराठ्यांनी निजामशाही पराभूत करून विजय मिळवल्याने या किल्ल्याला मोठा इतिहास आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे 1795 साली मोठी लढाई झाली होती. या लढाईत मराठ्यांनी निजामशाही पराभूत करुन विजय प्राप्त केला.
                    आजही खर्डा भागात अनेक ठिकाणी युध्दाच्या खुणा सापडत आहेत. रणटेकडी दौडवाडी येथून युध्दाची तयारी आखली जात होती. तेथे ही टेकडी रणांगणाची साक्ष देत उभी आहे.
ही लढाई पाणीपतनंतर विजयाची शौर्य गाथा ठरली होती. आजही अनेक खर्डा शहराच्या जवळपास पुरातन वास्तु इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
                    सुलतान दुर्ग किल्ल्याची दुरावस्था झाल्याने पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि हे काम सुरू असताना खोदकाम करताना 250 तोफगोळे आणि तोफेचा फुटलेला भाग आढळून आला.
                    यापूर्वी देखील येथील शेतकऱ्यांना शेती काम करताना जुन्या तलवारी, ढाल आणि काही तोफगोळे देखील सापडले होते. मात्र आता तब्बल 250 तोफगोळे सापडल्याने या सर्व वस्तूंचे पर्यटकांसाठी किल्ल्यातच पुन्हा जतन करून ठेवावे अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत.

...............................

२ लाख हून अधिक वाचक

५००+ व्हॉट्सॲप ग्रुप

ऑनलाईन व प्रिंट मीडिया

.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क  साधा :9529501121/9529880144
                                      कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.

Comments