शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना 2020 21 शैक्षणिक वर्षातील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात यासाठी निवेदन
केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने नियम शिथिल करून सर्व व्यवहार पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे 15 फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू करण्यात आलेली आहेत. पण समाजातील लोक निष्काळजीपणाने वागत असल्यामुळे, राज्यातील पंधरा जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा रात्रीची संचारबंदी सुरू करण्यात आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लॉकडाउन चे संकेत दिलेले आहेत. तसेच 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू झाली आहेत. पण अद्यापही काही वसतिगृह कॉरनटाईन सेंटर म्हणून वापरात आहेत. त्यामुळे परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताचा विचार करता, विद्यार्थी पालक संघटना कोल्हापूर च्या वतीने माननीय कुलगुरू यांना हे शैक्षणिक वर्ष 2020 - 21 च्या प्रथम सत्राच्या शिवाजी विद्यापीठाच्या होणाऱ्या सर्व शाखांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात. असं या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.
यावेळी कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष फिरोज सरगुर तसेच कृष्णा बगाडे, रोहित जोशी, नागेश फरांडे (शहर उपाध्यक्ष), मंदार चिले, सखी बिजनी आदी उपस्थित होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा