लॉकडाऊनचा 'बाहुबली' फेम प्रभासला फटका, 1000 कोटींचं कर्ज

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. संपूर्ण देश तीन महिन्यांहून अधिक काळ बंद होता. या लॉकडाऊनच्या काळात भल्याभल्यांचं कंबरडं मोडलं. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. सिनेसृष्टीलाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार प्रभासचंही मोठं नुकसान झालं आहे. प्रभासच्या प्रोडक्शन हाऊसला जवळपास हजार कोटींचा तोटा झाला आहे. 'बाहुबली' फेम प्रभासवर 1000 कोटींचं कर्ज आहे. 

 बाहुबली फेम प्रभासची कंपनी यूव्ही क्रिएशन्स 'राधे श्याम' हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मु
ख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमध्ये झाले असून 30 जुलै रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. कंपनीच्या मोठ्या नुकसानामुळे प्रभास आणि त्याच्या टीमला या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. या चित्रपटात प्रभास लव्हर बॉयची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे.

चित्रपट 'राधे श्याम' टीझर रिलीज

'राधे श्याम'च्या रिलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसत आहे. टीझरमध्ये दोघेही 'राधे श्याम' चित्रपटातील एक डायलॉग बोलताना दिसत आहेत. यामध्ये पूजा प्रभासला म्हणते की, 'स्वतःला रोमियो समजतोस का?', तिला उत्तर देताना प्रभास म्हणतो की, 'नाही, त्याने प्रेमासाठी जीव दिला होता, मी त्या टाइपचा नाही.'

'राधे श्याम' व्यतिरिक्त प्रभासचे आगामी सिनेमे राधे - श्याम व्यतिरिक्त आदिपुरुषमध्येही प्रभास दिसणार आहे. यामध्ये भगवान श्रीराम यांची भूमिका प्रभास साकारणार आहे. अजय देवगण यामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सालार,  आणि नाग अश्विनची मल्टीस्टारर फिल्म 'साय-फाय' मध्येही प्रभास दिसणार आहेत. प्रभासचे हे सर्व चित्रपट पॅन इंडियावर रिलीज होणार आहेत. 

Comments