तेहतीस हजार रुद्राक्षातून साकारली 10 बाय 10 फूट छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा

 कोल्हापूर : करवीर नागरी ही छ.शिवरायांच्या पासून छ.ताराराणी, छ. शाहू महाराज यांचे आचार - विचार यांचा वारसा  चालवणारी नगरी असून शौर्य, व कलेला दाद देणारी आहे,  असे प्रतिपादन छत्रपती मधुरीमाराजे यांनी केले.     छ. शिवाजी चौक तरुण मंडळ आयोजित छ. शिवाजी महाराज जयंती  निमित्त 33,000 (तेहतीस हजार) रुद्राक्ष यातून तयार केलेली, 10 बाय 10 फूट  छ. शिवप्रतिमा  उदघाटन  प्रसंगी त्या बोलत होत्या.  यावेळी ही शिवप्रतिमा तयार करणारे कलाकार अतुल माने, चेतन राऊत यांचा शाल ,श्रीफळ व श्री महागणेश  प्रतिमा देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करणेत आला. यावेळी नंदकुमार वळंजू, राज कोरगावकर, प्रसाद वळंजू आदी उपस्थित होते. तसेच लहान मुलांनी मर्दानी खेळांचे  प्रदर्शन केले.

Comments