गावचे बाबासाहेब लाड हे संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरपा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत शिक्षक गटातून प्रथम क्रमांक पटकावला.
गावचे बाबासाहेब लाड हे संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरपा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत शिक्षक गटातून प्रथम क्रमांक पटकावला.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील 'जमयी जमातुल मुस्लिमीन'या संघटनेमार्फत प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्यावर आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत त्यांनी हे यश मिळवले. त्यांना सात हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत एकूण एकशे सत्तावीस स्पर्धकांनी
भाग घेतला होता. ते मूळचे सरुड, तालुका शाहुवाडी, जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. एक हरहुन्नरी, विद्यार्थीप्रती तळमळ असणारे शिक्षक म्हणून त्यांची साखरपा परिसरात ओळख आहे. त्यांनी राज्यस्तरावरील अनेक निबंध लेखन,वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवले आहे.ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात सहभागी असतात .त्यांच्या या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी शशिकांत त्रिभवणे विस्तार अधिकारी प्रकाश जाधव ,केंद्रप्रमुख कृष्णकांत साळुंखे मुख्याध्यापक सौ. दिव्या भाटकर व शिक्षक वर्गाने अभिनंदन केले आहे.

Comments
Post a Comment