कोंबडीच्या पिलाला चक्क चार पाय

 संगमेश्वर : निसर्गामध्ये अनेकदा आश्यर्य कारक घटना  घडत असतात काही वेळा आपल्याच आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही.मात्र अशीच एक घटना संगमेश्वर तालुक्यातील  कोंडीवरे रजा नगर येथील उमेश भीमराव मोहिते  यांच्या घरात पाळीव कोंबडीने चक्क चार पाय असलेल्या पिलाला जन्म दिला असून त्याला पाहण्यासाठी परीसरातून गर्दी

 सर्वसामान्य पणे  कुटुंबात उरलेले अन्न  खाण्यासाठी व गावठी अंडी  मिळावीत या उद्देशाने मोहिते कुटुंबाने घरात कोंबडी पाळल्या आहेत . त्यातीलच एका कोंबडीने 11 डिसेंबर रोजी आठ पिलांना जन्म दिला त्यातीलच एक पिल्लू मात्र चमत्कारिक रित्या जन्मला आल्याचे दिसून आले .त्या पिलाला नियमित इतर पिला प्रमाणे एक डोके,दोन डोळे, दोन पंख,एक चोच आहे .मात्र दोन पाया ऐवजी चक्क चार पाय असल्याने त्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला .शरीराची रचना नियमित पिला सारखी असली तरी पुढच्या दोन पायावर हे पिलू चालू व धावू शकते, याच पायाच्या थोड्याश्या मागील अंतरावर हे नवीनच पाय असून त्या उंचीने कमी आहेत.चालताना कोणताही अडथळा होत नाही. पुढच्या पायाने  सर्व क्रिया करत आहे.इतर हि पिल त्याला सामावून घेत असल्याने त्याची आई मात्र आपल्या पिला पाशी कोणी  आल्यास  त्यांचे पासून संरक्षण करण्यास अंगावर जात आहे.
प्रतिक्रिया:--अंडयातून  कोंबडीची पिल बाहेर पडली तेंव्हा चक्क चार पायाचे पिलू पाहिल्यावर निसर्गाचा चमत्कार  आहे असं संमजून या पिलाची विशेष काळजी घेत आहे .या पिलाला मोठे करून त्याचा चांगला सांभाळ करणार असल्याचे कोंबडीचे मालक
 सौ विद्या उमेश  मोहिते यांनी सांगितले.
फोटो ओळी :- चार पाय पिलाला असल्याचे दाखवतना कुटूंबातील प्रमुख व्यक्ती
हि बातमी इतराना समजतात अनेकजण त्याला पाहण्यासाठी मोहिते यांच्या घराला भेट देऊ लागले.


Comments