साडवलीतील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाला उस्फुर्त प्रतिसाद
देवरूख : प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे स्टुडंट डेव्हलपमेंट फाऊंडेशन साडवली संचालित, पारस अकॅडमी आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण चालू आहे. मीनाताई ठाकरे विद्यालय साडवली ग्राउंड वर ह्या प्रशिक्षण तालुक्याभरातून उत्तम प्रतिसाद लाभत असून यामध्ये १८ मुली व २२ मुले असे एकूण ४० विद्यार्थी सहभागी आहेत. पोलीस भरती पुढे गेल्याने पुन्हा १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणा मध्ये सामील होण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी ३० डिसेंबर २०२० पर्यंत प्रवेश घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण दुपार पर्यंत चालू असते, त्यानंतर सगळे विद्यार्थी आपापल्या घरी जातात. क्लास रूमची सुविधा, टॉयलेट, बाथरूमची स्वातंत्र्य सुविधा मुलींसाठी चेंजेस रूमची सुविधा. अनुभवी शिक्षक वर्ग, लांबून येणाऱ्याना राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येईल. स्टुडंट डेव्हलपमेंट फाऊंडेशन, साडवली संचालित आणि पारस अकॅडमी आयोजित आता पोलिससह आर्मी, मिलिटरी, जिल्हा परिषद-क्लार्क, कलेक्टर ऑफिस-क्लार्क, बँकिंग, तलाठी, ग्रामसेवक, कृषिअधिकारी व सहाय्यक आदी पदांचे भरतीपूर्व प्रशिक्षण, MPSC/UPSC Traininig व मार्गदर्शन, दर शनिवार, रविवार देवरुख-साडवलीमध्ये घेण्यात येणार आहे. १५ जानेवारी २०२१ पासून ही प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असून पहिल्या ३० उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क -९८९०२६४१४४/ ९०२२४५८८३४ या नंबरवर साधण्यात यावा.
Comments
Post a Comment