रत्नागिरी:कोरोनाच्या नव्या अवताराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून येणाऱ्या प्रत्येकावर लक्ष ठेवले जाणार आहे. मात्र नागरिकांनी घाबरू नये पण काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हावासियांना केले आहे. इंग्लंड मधील कोरोना विषाणुमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या विशेष मार्गदर्शक सुचने नुसार रत्नागिरी जिल्हयामध्ये इंग्लंडमधुन रत्नागिरीत आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. कुणीही घाबरुन न जाता किंवा अफवांवर विश्वास न ठेवता तसेच विदेशातुन आलेल्या प्रवाशांनी स्वत: हुन जिल्हा प्रशासनाला माहिती देवुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनाराण मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीम. इंदुराणी जाखड यांनी केले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी डॉ. श्रीम. कमलापूरकर यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment