सालाबाद प्रमाणे काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन २८ डिसेंबर सोमवार रोजी मोठ्या दिमाखात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 सालाबाद प्रमाणे काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन २८ डिसेंबर सोमवार रोजी मोठ्या दिमाखात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले  आहे.त्यानिमित्त काँग्रेस भवन इमारतीस विद्युत रोषणाई लाऊन इमारतीची शोभा वाढवणार आहेत. तसेच ११ वाजता काँग्रेस पक्षाच्या वाटचाली वरती परिसंवाद  आयोजित करण्यात आलेला आहे आणि कोरोना काळात ज्यांनी जनतेची मदत केली त्या कोविड योद्धा तसेच ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्याचे नियोजित आहे. त्यानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,एन एस यु आय,सेवा दल अल्पसंख्यांक विभाग,अनुसूचित विभाग व इतर सर्व विभागाच्या पदाधिकारी,कार्यकर्ते व काँगेस प्रेमी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड विजयराव भोसले यांनी केले आहे.

Comments