जैतापूरात अणूऊर्जा प्रकल्पाचा ऐवजी सौरऊर्जा प्रकल्पाची मागणी ही राजकीय हेतूनेच जानशी येथील ग्रामस्थ राजा पटवर्धन यांची प्रतिक्रिया
राजापूर तालुक्यातील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प व्हावा ही जी मागणी केली जात आहे ती राजकीय हेतूनेच केली जात आहे अशी प्रतिक्रिया जानशी गावातील ग्रामस्थ व जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प समर्थक राजा पटवर्धन यांनी व्यक्त केली आहे. गावात वाद निर्माण व्हावेत हा हेतू या मागणीच्या पाठीमागे आहे असे मत राजा पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प अजुनही रद्द झालेला नाही. या भागातील ग्रामस्थांनी जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला सहमती दर्शवत जमीनही दिली आहे. असे असताना देखील आता एवढी वर्षे लोटल्यानंतर या जमिनिवर सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी होतेय. ही बाब चुकिची आहे. सौर ऊर्जा प्रकल्प व्हावा ही मागणी लोकप्रतिनिधींची आहे. ग्रामस्थांची नाही. ही मागणी करत असताना तांत्रिकदृष्ट्या माहीती देण्यात आलेली नाही. जैतापूर परिसरात सुर्यप्रकाश किती पडतो आणि त्यातून किती विज निर्मिती होणार याची सविस्तर माहीती ज्यानी कुणी ही मागणी केली आहे त्यांना आहे का? तांत्रिक माहीती असल्यास ही माहीती जनतेला द्यावी. यात जनतेची दिशाभूल होऊ शकते. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या जागेत अणूऊर्जा प्रकल्प हाच प्रकल्प व्हावा जो जनतेला मान्य आहे आणि शासनाने मंजूर केला आहे अशी मागणी राजा पटवर्धन यांनी केली आहे.
Comments
Post a Comment