"युनायटेड इंग्लिश स्कूल ची क्रीडा भरारी"

 चिपळूण :-योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन योगासन स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी स्वराली उदय तांबे   इ ७ वी अ चौथ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे .या  स्पर्धेतून तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली .

         5 डिसेंबर रोजी 14 वर्षाखालील मुली वयोगटात ऑनलाईन योगासन स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये 45 खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेदरम्यान स्वराली ने केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे तिला यंदाही सुवर्णपदक मिळाले यापूर्वी सलग तीन वेळा ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली होती. इयत्ता तिसरी पासून  पागव्यायाम शाळा  मध्ये ती रणवीर सावंत कडे योगाचे धडे घेत होती. तसेच तिला प्रशालेचे क्रीडाशिक्षक सोमनाथ सुरवसे सर व समीर कालेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले .

       त्या यशस्वी खेळाडूचे अभिनंदन करताना चिपळूण तालुक्याचे नायब तहसीलदार श्री तानाजी शेजाळ साहेब तसेच प्रशालेचे स्कूल कमिटी चेअरमन आनंद साठे साहेब, संस्था पदाधिकारी विठ्ठल चितळे,प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीकृष्णत शिंदे , उपमुख्याध्यापिका सौ वीणा चव्हाण,पर्यवेक्षक श्री संजय बनसोडे, पर्यवेक्षिका सौ स्वप्नाली पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



Comments